विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊
आपण सर्वजण खूप छान आणि मन लावून अभ्यास करत आहात आणि आता आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस सामोरे जाणार आहोत. त्यासाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट आता उपलब्ध झाली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या वर्षी 29 एप्रिल 2023 या दिवशी होणार आहे यासाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून डाऊनलोड करून घ्यावे.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपणास आपला रजिस्ट्रेशन नंबर नोंदवायचा आहे आणि त्याखाली पासवर्ड म्हणून आपली जन्मतारीख नोंदवायची आहे त्यानंतर खाली जो कॅपच्या दिला आहे त्यामधील गणितीय क्रिया करून त्याचे उत्तर दिलेल्या स्पेस मध्ये नोंदवावे. त्यानंतर साइन इन वर क्लिक करून साइन इन करावे.
आता आपल्यासमोर आपले हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी ची लिंक उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा
👇👇
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
वरील पेज ओपन होण्यासाठी वेळ लागत असेल किंवा व्यवस्थित ओपन होत नसेल तर रिफ्रेश करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा