नवोदय चा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही.... हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ❓
बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म सबमिट केल्या नंतर जो रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो माहिती नाही किंवा रिसीप्ट सापडत नाही आणि रजिस्ट्रेशन नंबर शिवाय हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही.
अशी समस्या असेल तर घाबरू नका.... ही पोस्ट तुमच्या साठीच आहे.
खाली लिंक दिली आहे ती वापरून तुम्ही स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता आणि त्यानंतर हाॅल तिकिट डाऊनलोड करणे सोपे आहे.👇👇
खालील सूचना काळजीपूर्वक वाचा
लिंक वर टच केल्या नंतर आपल्या समोर खालील पेज ओपन होईल.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपणास आपला रजिस्ट्रेशन नंबर नोंदवायचा आहे आणि त्याखाली पासवर्ड म्हणून आपली जन्मतारीख नोंदवायची आहे त्यानंतर खाली जो कॅपच्या दिला आहे त्यामधील गणितीय क्रिया करून त्याचे उत्तर दिलेल्या स्पेस मध्ये नोंदवावे. त्यानंतर साइन इन वर क्लिक करून साइन इन करावे.
आता आपल्यासमोर आपले हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी ची लिंक उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा
👇👇
वरील पेज ओपन होण्यासाठी वेळ लागत असेल किंवा व्यवस्थित ओपन होत नसेल तर रिफ्रेश करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा