V-School ॲप्लिकेशन मध्ये पालकांनी स्वतः च्या पाल्याची नोंदणी कशी करावी ... स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती


 V-School ॲप्लिकेशन मध्ये पालकांनी स्वतः च्या पाल्याची नोंदणी कशी करावी ... स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती 

स्मार्ट फोनच्या मदतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या संपूर्ण अभ्यासक्रम डिजिटल माध्यमातून शिकण्यासाठी V-School हे ॲप्लिकेशन विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.




हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून त्यामध्ये आपल्या पाल्याची नोंदणी कशी करावी यासाठी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती येथे देत आहे.

काळजीपूर्वक समजून घेवून आपल्या पाल्यांची नोंदणी करावी, लक्षात घ्या एका मोबाईल मध्ये आपण चार पाल्यांची नोंदणी करू शकता. 

1 सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये V-School टाइप करून खालील ॲप्लिकेशन सर्च करा 👇


2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा.

खालील प्रमाणे एप्लीकेशन ची माहिती देणाऱ्या चार स्क्रीन दिसतील, त्या वाचा आणि पुढे जा.












3 स्क्रीन ओपन झाल्यावर त्यामध्ये मोबाईल नंबर नोंदवून खालील चौकोनात स्पर्श करा आणि सर्व अटी व नियम मान्य करा त्यानंतर SMS द्वारे पाठवा यावर टच करा.







4 SMS द्वारे मिळालेला ओटीपी नोंदवून सबमिट यावर क्लिक करा.





5 नंतर खालील स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये आपण आपल्या चार पाल्यांचे प्रोफाइल तयार करू शकता. ऍड प्रोफाइलच्या प्लस बटनवर टच करा.



6 विद्यार्थी नोंदणीची विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याचे आडनाव जन्म दिनांक पुरुष स्त्री असे लिंग आणि विद्यार्थ्यांचे टोपण नाव ज्या नावाने प्रोफाइल ओळखले जाईल असे नाव नोंदवावे उदाहरणार्थ Maya
सर्व माहिती नोंदविल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे





खालील प्रमाणे माहिती भरावी




7 खालील विंडो ओपन झाल्यानंतर आपल्या पाल्याची माहिती नोंदवताना महा राज्य महाराष्ट्र बोर्ड महाराष्ट्र बोर्ड शिकण्याचे माध्यम अभ्यासक्रम संच आणि त्याची योग्य इयत्ता निवडून पुढे या बटनावर क्लिक करावे.





8 विद्यार्थी नोंदणी करताना पुढील पायरी महत्त्वाची आहे यामध्ये खालील रकाने मध्ये शाळा निवडा यावर टच करावे.






9 आपण आपल्या पाल्याची शाळा निवडताना शाळेच्या नावाने किंवा यु-डायस नंबर ने शाळा शोधू शकता.
शाळेच्या नावाने शोधल्यानंतर आपली शाळा सर्च झाली नाही तर कृपया या सोबत खालील दिलेल्या लिंक वर टच करून आपण त्यामध्ये राज्य जिल्हा तालुका आणि गावाचे नाव टाकून सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील सर्व शाळांचे यु-डायस नंबर कळतील तो नंबर खालील रकान्यात नोंदवावा.

_____________________________________________

आपल्या शाळेचा यु डायस नंबर माहित नसेल तर तो शोधण्यासाठी खालील लिंक ओपन करा व शाळेचा युडायस नंबर शोधा 👇 


_____________________________________________









10 विद्यार्थी नोंदणी मध्ये शाळेची निवड झाल्यानंतर शालेय अभ्यासक्रम या बटणावर क्लिक करा 👇



11 विद्यार्थी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रोफाइल पुढील पद्धतीने दिसेल ज्यामध्ये आपण आपल्या पाल्याने या ॲप्लिकेशनच्या मदतीने किती वेळ अभ्यास केला आहे हे आपणास समजू शकते.
यामध्ये माझी शाळा शालेय अभ्यासक्रम गुणवत्ता यादी स्पेशल कोर्स माझी प्रगती आणि दिनविशेष अशा सहा विंडो आहेत.


12 माझी शाळा या विंडोमध्ये आपल्या शाळेतील किती विद्यार्थी हे एप्लीकेशन वापरतात त्या संदर्भातील माहिती पाहता येईल.



13 शालेय अभ्यासक्रम यावर टच केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल ज्यामध्ये वेगवेगळे विषय याच्या विंडो दिसतील. यामध्ये आपण हवा त्या विषयाच्या अभ्यास करू शकता.



14 गुणवत्ता यादी या वर क्लिक केल्यानंतर खालील पद्धतीने राज्यातील टॉपर इतर टॉपर यांची माहिती उपलब्ध होते.



15 स्पेशल कोर्सेस यावर क्लिक केल्यानंतर आपणास शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस दहावी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा माझी ओळख माझे संविधान हसत खेळत योगा आणि परिपाठ यांच्या विंडो दिसतील त्यातील हवेतील विंडो ओपन करून आपण त्यांचा अभ्यास करू शकता.


16 माझी प्रगती या बटनावर क्लिक करून आपण स्वतःची प्रगती जसे की.... स्वतःचा आवडता विषय, जिल्हास्तरीय रँक, तालुकास्तरीय रँक आणि शाळा स्तरीय रँक यांची माहिती मिळवू शकता.





17 त्यानंतर सहावी विंडो म्हणजे दिनविशेष संदर्भातील आहे. यावर क्लिक करून आपण चालू तारखेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेऊ शकतो.





या पद्धतीने आपल्या पाल्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी हे ॲप्लिकेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपले पाल्य या ॲप्लिकेशनच्या मदतीने स्वतः अभ्यास करून स्वतःची प्रगती साध्य करू शकतात.

सुलभक
संतोष सुतार (8600250052)
प्राथमिक पदवीधर, जि.प.मा.शा. नागापूर
या. परळी - वै., जिल्हा - बीड 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा