आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये किती वर्षाचा फरक असतो? |
आपलाच जन्मदिवस आणि वाढदिवस या मध्ये किती वर्षाचे अंतर असते ?
आपण आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, नातेवाईकांना जन्मदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो. कार्यकर्ते, चाहते नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठाले बॅनर लावतात त्यात काही जन '......ला वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहितात तर काही जन ....... जन्मदिनाच्या शुभेच्छा लिहितात. आता यात काहीच चुकले नाही पण जेंव्हा आपण तो वाढदिवस किंवा जन्मदिवस कितवा आहे हे लिहून शुभेच्छा देत असतो त्यावेळेस आपणांस हे लक्षात घ्यावे लागेल की ज्या दिवशी आपला जन्म होतो तो आपला पहिला जन्म दिवस असतो त्या दिवसाला आपण पहिला वाढदिवस म्हणत नाही. तर एक वर्षानंतर जेंव्हा पून्हा तीच तारीख येते तेंव्हा त्यावेळी आपल्याला एक वर्ष पुर्ण झाल्यामुळे पहिला वाढदिवस आपण साजरा करतो पण तो असतो आपला दुसरा जन्म दिवस.
म्हणजेच आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये एका वर्षाचे अंतर असते हे लक्षात घ्यायला हवे. वाढदिवस आणि जन्म दिवस हे आपण एकमेकांचे पर्यायी शब्द म्हणून जरी वापरत असलो तरी प्रत्येक व्यक्तीच्या जन्मदिनापेक्षा वाढदिवस हा एक वर्षाने लहान असतो हे लक्षात घ्यायला हवे.
असाच गोंधळ स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन यामध्ये होतो हे ही आपण समजून घेतले पाहिजे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. तो पहिला स्वातंत्र्य दिन आणि एक वर्षानंतर आपण दूसरा स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यालाच आपण स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन असे म्हणतो.
Independence Day स्वातंत्र्य दिन |
येथेही हे लक्षात घ्यायला हवे की आपण या वर्षी 15 ऑगस्ट 2022 ला जो स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत तो 76 वा स्वातंत्र्य दिन असेल आणि 75 वा वर्धापन दिन. त्यामुळे काही जन शुभेच्छा संदेश लिहिताना असे लिहितील की '76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!' किंवा काही जन असे लिहितील की 'स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!' ... हे दोन्ही शुभेच्छा संदेश अगदी बरोबर असणार आहेत पण ज्यांना स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन यातला फरक माहित नसतो त्यांना कोणाचे तरी काही तरी चुकते आहे असे वाटत राहते.
पण हे लक्षात असू द्या स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनापेक्षा एक वर्षाने मोठा असतो.
जन्म दिवस आणि वाढदिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन याबद्दल समज वाढावी यासाठी हा लेख लिहिला आहे. आपल्याला अशा प्रसंगांचा कधी सामना करावा लागला होता का ? किंवा असे आनखी वेगळे काही प्रसंग आपल्या बाबतीत घडले असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.
... संतोष सुतार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा