online students offline meeting |
ऑनलाईन विद्यार्थीनीची ऑफलाईन भेट
कोविड 19 च्या संसर्गामुळे मागिल वर्षी शाळा पुर्णपणे बंद होत्या, तेंव्हा माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरला होता. गेल्या वर्षी 30 WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून हा उपक्रम चालत होता. आज याच उपक्रमांतर्गत पाचवी नवोदय, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, आठवी NMMS चा मोफत मार्गदर्शन उपक्रम चालतो ज्याचा विस्तार 80 WhatsApp ग्रुप मध्ये पसरला आहे.online students offline meeting
गेल्यावर्षी या उपक्रमाचे 151+ विद्यार्थी राज्यभरात नवोदय विद्यालय प्रवेश पात्र ठरले आहेत आणि 100+ विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभार्थी आहेत.
शिकण्याची तळमळ असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच लाभ घेतला त्यातील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि गरीब परिस्थितीतील आहेत.
शाळा पुर्णपणे बंद असतानाही अशा विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय ॲडमिशन आणि माय व्हिजन पाचवी शिष्यवृत्ती या उपक्रमांच्या माध्यमातून शिकता आले याचे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही खुप समाधान वाटले. 'online students offline meeting'
कोविड परिस्थिती मुळे शाळा बंद असल्याने केवळ आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून चालू झालेला उपक्रम राज्यभर पोहचला, आणि मी ( संतोष सुतार ) माझे मित्र धनराज परगेसर ( Dhanraj Ashokrao Parge ) आणि गोवर्धन शिंदे सर ( Govardhan Shinde ) राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सुलभक, मार्गदर्शक झालो. हे मागील वर्षी चे विद्यार्थी आजही फोन करतात, आपल्या भावना व्यक्त करतात आणि आमच्याकडे या असे आग्रहाचे निमंत्रण देतात. "online students offline meeting"
असाच मी हरिजवळगा ता निलंगा या माझ्या सासरवाडीत गेलो असता तेथील आमची ऑनलाईन विद्यार्थीनी कु साक्षी भिम माने ला मी गावात आल्याचे कळताच, शेतात असलेल्या घराकडे येण्याचे निमंत्रण दिले आणि लगेच वडिलांना पाठवले.
मी त्यांच्यासोबत त्याच्या शेतातील घरी गेलो. भुकंप ग्रस्थ हे क्षेत्र असल्याने 93 च्या किल्लारी भुकंपापासून हे कुटुंब शेतातच राहते. आता आमदार साहेब ( जनसेवक अभिमन्यू दत्तात्रय पवार ) यांच्या दूरदर्शी आणि शेतकरी लाभाच्या योजनेतून शिवार रस्ता शेतापर्यंत होतो आहे.
मी आल्याने कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याचे लक्षात आले, साक्षीने खास माझ्यासाठी बोरसुरी वरणाचा बेत आखला. (बोरसुरी वरण म्हणजे शाकाहारी मेजवानी चा लातूर, निलंगा, उदगीर व या परिसरातील आवडीने खाल्ला जाणारा मेनु आहे) माझे नुकतेच जेवन झाले असल्याने बोरसुरी वरणाचा पुरेपूर आनंद घेता आला नाही.... पण कुटूंबातील सर्वांचा आग्रह असल्याने थोडेसे जेवण केले... अत्यंत चवदार बोरसुरी वरण, रुचकर ज्वारीची भाकरी, गाजर, काकडी, कांदा, शेंगदाणे असा सुंदर मेनु होता. online students offline meeting
साक्षी ही राज्यभरातील हजारो ऑनलाईन विद्यार्थ्यांपैकी एक गुणवान विद्यार्थ्यांनी आहे. शिकण्याची तळमळ असणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहचता आलं आणि या काळात त्यांना या उपक्रमामुळे शिकता आलं याच समाधान कुटुंबाच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. "online students offline meeting"
अशी ही ऑनलाईन विद्यार्थ्यांनीची ऑफलाईन भेट आमच्या उपक्रमास उर्जा देणारी ठरली आहे.
online students offline meeting |
आपल्या ज्ञानाचा निस्वार्थी वृत्तीने वापर करण्याचा मार्ग आपण अनेकांना दाखवत आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत आहात.... अशी गोड फळे मिळतच राहतील.... आपल्यासारख्या गुणी व्यक्तीचा सहवास मला लाभला, माझ्यासाठी अविस्मरणीय काळ असेल....
उत्तर द्याहटवाखरं सांगायचं झालं तर आपण या विद्यार्थ्यांचे एक मोलाचे मार्गदर्शक आहात. या लॉकडाउनच्या काळात माय विजन नवोदय ॲडमिशन च्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी नवोदय विद्यालयात लागलेले आहेत व भरपूर जणांना मार्गदर्शन मिळत आहे.ही आपल्या त्रिमूर्तीची कमाल आहे. सुतार सर, परगे सर व शिंदे सर या तिघा जणांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तुमच्या या क्लास च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात लागावेत ही प्रभू वैद्यनाथाचे चरणी प्रार्थना.
उत्तर द्याहटवासुतार सर तुम्हां सर्वांचे काम खुपच प्रेरणादायी आहे. सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन
उत्तर द्याहटवासर,असे लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत की ज्यांना आपण माय व्हिजन नवोदयच्या माध्यमातून खरे यशस्वी बनवले.महाराष्ट्रभर तुमचे चाहते आहेत.अभिनंदन!!
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर!!!आपण माय व्हिजन नवोदयच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र काबीज केलाय!!!
उत्तर द्याहटवा