JNVST TEST MAT 22 |
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊
JNVST TEST MAT 22
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 22 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 22'
आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.
सुलभक
संतोष सुतार,
8600250052
__________________________________________________________________________________________
3. आकृती पूर्ण करा AAKRUTI PIRNA KARA
सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते.
• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇
1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात."JNVST TEST MAT 22"
2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.
3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात.
किंवा
प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. JNVST TEST MAT 22
4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा