सराव चाचणी क्र 17 | घटक 2 जुळणारी आकृती शोधा

 






विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 17 चे आयोजन केले आहे.


आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊


चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇



या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.



सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________


घटक 2. जुळणारी आकृती शोधा


सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.


• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :


1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.


2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.


3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.


वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा