सराव चाचणी क्र 7 आरशातील प्रतिमा

 


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 24/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 7 आरशातील प्रतिमा  यावर आधारित सराव चाचणी क्र 7  चे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇




चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇


https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052


सूचना - या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंध कसे दिसेल, हे शोधायचे असते.


●● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात : 


1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.


2. प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.


3. प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. 4. प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.


वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक-एक करून वगळले जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

४ टिप्पण्या: